Wednesday, July 3, 2024

तडीपरी आणि निलंबन ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

तडीपरी आणि निलंबन

लाडा लाडाने हातवारे करण्याचा,
कुणाचाच चाळा काही बरा नाही.
शिवीगाळ करीत डॉनवेपणा करणे,
असला असंसदीयपणा खरा नाही.

दिल्ली पासून मुंबई पर्यंत,
विरोधी पक्ष नेते गोत्यात आहेत.
निलंबनास्राचे हुकमी बाण,
सत्ताधाऱ्यांच्या भात्यात आहेत.

तडीपारी कुठलीही असली तरी,
शेवटी तडीपारी ती तडीपारी आहे !
प्रासादिक वाणीची अपेक्षा,
जेवढी बरी तेवढीच खरी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8611
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
3 जुलै 2024
 

No comments:

daily vatratika...29jane2026