Thursday, July 18, 2024

सार्वजनिक सत्य...सार्वजनिक सत्य

आजची वात्रटिका
--------------------------

सार्वजनिक सत्य

सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली,
आपापली धार्मिकता जपली जाते.
जपणारे बहुसंख्य असले की,
आपापली धार्मिकता खपली जाते.

आपल्या धार्मिक उदात्तीकरणाला,
संस्कृतीचे जतन म्हटले जाते.
दुसऱ्याने असे काही केले की,
आपले मात्र डोके उठले जाते.

ज्याला त्याला आपल्या धर्माचा,
नक्कीच अभिमान आणि आब आहे !
पण हे सार्वजनिक सत्य विसरू नये,
धार्मिकता ही खाजगी बाब आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8626
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
18जुलै 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...