Saturday, July 27, 2024

लाडकीचा तडका..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
लाडकीचा तडका
सर्वांच्या तोंडी एकच चर्चा,
लाडकी आणि लाडकी आहे.
तोपर्यंत बातमी आली,
तिजोरीत म्हणे कडकी आहे.
विरोधकांच्या तोंडी सुद्धा,
फक्त लाडकी एक लाडकी आहे.
बहिणीचे लाड कसे पुरवायचे?
तिजोरीला म्हणे धडकी आहे.
ज्याच्या त्याच्या आवडीचा,
लाडकी हा शब्द लाडका आहे !
उठसूट कोणत्याही प्रकरणाला,
लाडकी शब्दाचा तडका आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8635
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
27जुलै 2024

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...