आजची वात्रटिका
--------------------------
मुके दुःख
सर्वच नेत्यांच्या पायाला,
लागलेली भिंगरी आहे.
त्यांच्या भिंगुर भवरेपणात,
कार्यकर्त्यांची चेंगराचेंगरी आहे.
जसे कार्यकर्ते चेंगरतात,
तसे कार्यकर्ते गांगररले जातात.
पक्षांतराच्या नांगराने,
कार्यकर्ते नांगरले जातात.
आपल्याच अवस्थेवर,
कार्यकर्त्यांची खिदळण सते !
इच्छा असो वा नसो,
नव्या गुलालाची उधळण असते!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8622
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
14जुलै 2024

No comments:
Post a Comment