Monday, July 22, 2024

एकत्रीकरणाची चर्चा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

एकत्रीकरणाची चर्चा

काही चर्चा घडल्या जातात,
काही चर्चा घडवल्या जातात.
एकत्रीकरणाचे ढोल,
समर्थकांकडून बडवल्या जातात.

शिवसेनेच्या बाबतीत जे घडले,
तेच राष्ट्रवादी बाबत घडते आहे.
भावा-भावाच्या एकत्रिकरण चर्चेत,
काका-पुतण्याची भर पडते आहे.

त्या वाक्यालाच पुन्हा ऊत येतो,
राजकारणात काहीही अशक्य नाही!
जे आहे ते वास्तव आहे,
हे काही फक्त टाळीचे वाक्य नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8630
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
22जुलै 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 7सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 99 वा

दैनिक वात्रटिका l 7सप्टेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 99 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Ud9ziVPHpKdC6VtEsC9M...