Thursday, July 25, 2024

गौप्य स्फोटाचे टायमिंग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

गौप्य स्फोटाचे टायमिंग

इथे प्रत्येकाचे गुपित,
अगदी प्रत्येकाला माहित आहे.
आपल्याला कोणी नडत नाही,
तोपर्यंत गौप्यस्फोट रहीत आहे.

एकमेकांचे गुपित,
एकमेकांकडून झाकले जाते.
तेरी भी चुप मेरी भी चूप,
सगळे कानामागे टाकले जाते.

नागव्यांचा स्वार्थ असा,
नागव्यांकडूनच जपला जातो !
ज्याचा त्याचा स्वार्थ साधला की,
त्यांचा नागवेपणा खपला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8633
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
25जुलै 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...