Friday, July 12, 2024

अनंत-राधिका शुभविवाह...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अनंत-राधिका शुभविवाह

शाही विवाहाची परंपरा पाळीत,
आपला शाहीपणा जपला आहे.
जिओ.....मेरे लाल... म्हणीत,
तुमच आमचा खिसा कापला आहे.

आधी फुकट;आता दाम दुप्पट,
असा मोबाईलचा डाटा आहे.
आता कळाले का शाही विवाहात,
आपलाही सिंहाचा वाटा आहे.

श्रीमंतांनी गरिबांना चढवलेली,
शाही विवाहाची शाही नशा आहे !
आपण लग्नपूर्व सोहळे पाहिले,
लग्नोत्तर सोहळ्यांचीही आशा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8620
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
12जुलै 2024
 

No comments:

daily vatratika...18octo2024