Saturday, July 13, 2024

क्रॉस वोटिंग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

क्रॉस वोटिंग

कधी क्रॉस वोटिंग केले जाते,
कधी क्रॉस वोटिंग करून घेतले जाते.
कुणाचा निकाल कसा लावायचा?
याच्यावरती क्रॉस वोटिंग बेतले जाते.

पक्ष आणि ध्येय धोरणाचा,
जेव्हा जेव्हा जिथे जिथे त्रास होतो.
तिथे तिथे आपल्याच माणसांच्या,
श्रद्धा आणि सबुरीचा क्रॉस होतो.

जे जिंकले त्यांचे अभिनंदन,
जे पडले त्यांची मात्र दया आहे !
ग्रामपंचायत निवडणूक
हाच खरा क्रॉस वोटिंगचा पाया आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8621
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
13जुलै 2024
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...