Monday, July 29, 2024

वेषांतर,पक्षांतर आणि सत्तांतर ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

वेषांतर,पक्षांतर आणि सत्तांतर

वेषांतर,पक्षांतर आणि सत्तांतराचे,
एकदम रहस्यमय नाते आहे.
हुडी,मास्क आणि टोप्यावरती,
सांगा कुणाची नजर जाते आहे?

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीत,
वेषांतराचा सेम टू सेम रोल आहे.
आपल्या स्वतःच्या तोंडानेच,
स्वतःचीच जाहीर पोल खोल आहे.

वेषांतरामुळे लोकांचे लक्षांतर झाले,
लक्षांतरामुळेच पक्षांतर झाले आहे !
पक्षांतराच्या बिजापोटी,
राज्यात सत्तांतराचे फळ आले आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8637
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
29जुलै 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 16सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 108 वा

दैनिक वात्रटिका l 16सप्टेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 108 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1ZJ-teI8ofC940rJZ_a...