Tuesday, July 23, 2024

वाढदिवसाचे प्रयोजन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

वाढदिवसाचे प्रयोजन

नेत्यांचा वाढदिवस असला की,
कार्यकर्त्यांच्या निष्ठा उजळल्या जातात.
जेवढ्या पाजळता येईल तेवढ्या,
त्यांच्याकडून निष्ठा पाजळल्या जातात.

कुणाला वाढदिवस संधी वाटते,
कुणासाठी तो डोक्याला ताप आहे.
डिजिटल बॅनरची रुंदी आणि उंची,
हेच त्यांच्या निष्ठेचे मोजमाप आहे.

जसा कुणासाठी वाढदिवस भक्तीचा,
तसा कुणासाठी तो सक्तीचा असतो !
त्यापेक्षाही जास्त म्हणजे,
वाढदिवस राजकीय युक्तीचा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8631
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
23जुलै 2024
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...