Monday, July 15, 2024

उंदीर,बेडूक आणि साप...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

उंदीर,बेडूक आणि साप

कुणाच्या गळ्यामध्ये,
सांगा कुणाचे हाडूक आहे?
शालेय पोषण आहारात,
सापामागे बेडूक आहे.

आहाराला दूषण द्यायची
आमची कुठे इच्छा आहे ?
बेडूक आणि उंदरांमागे,
जणू सापाचा पिच्छा आहे.

गंभीर आणि किळसवाणे,
पण आहे ही फॅक्ट आहे !
गुत्तेदारांचे पाप फेडण्याचे,
शाळांकडे कॉन्ट्रॅक्ट आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8623
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
15जुलै 2024
 

No comments:

daily vatratika...18octo2024