Tuesday, July 2, 2024

विजयाचे श्रेय...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

विजयाचे श्रेय

पाऊस पडून गेल्यावरती,
बेडकांचे डराव डराव आहेत.
कुणी जिंकला विश्व कप?
कुणाच्या अभिनंदनचे ठराव आहेत?

क्रिकेट आणि राजकारणाचे,
अगदी सततचे लागेबांधे आहेत.
दोघेही एकमेकात घुसले की,
मग सगळ्याचेच वांधे आहेत.

ज्याच्या त्याच्या विजयाचे श्रेय
ज्याचे त्यालाच मिळाले पाहिजे !
नको त्याचा जय जयकार नको,
किमान एवढे तरी कळाले पाहिजे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8610
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
2 जुलै 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 7जुलै2024 वर्ष- चौथेअंक -37 वा

दैनिक वात्रटिका l 7जुलै2024  वर्ष- चौथे अंक -37 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1xaYl5gGvpoQ1W8CK4ulK-gFK4...