Thursday, July 4, 2024

भूल भुलैय्या ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

भूल भुलैय्या

लोकशाहीच्या सभागृहात,
वैयक्तिक दुश्मनी काढली जाते.
लोकहितापेक्षा स्वहिताचीच चर्चा,
सभागृहांमधून घडली जाते.

लोकसन्मानापेक्षाही त्यांना,
आत्मसन्मान मोठा वाटतो आहे.
त्यांचा लोकशाहीचा पुळका,
त्यामुळेच खोटा वाटतो आहे.

आपल्या वैयक्तिक लढायांना,
लोकहिताचा बेगडी रंग आहे !
हा तर स्वतःकडून स्वतःचा,
सरळ सरळ हक्कभंग आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8612
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
4जुलै 2024
 

No comments:

daily vatratika...3april2025