आजची वात्रटिका
--------------------------
बदलते रंग
कुणी रंग बदलले आहेत,
कुणी रूप बदलले आहे.
मित्रांपासून थेट शत्रूंपर्यंत,
कुणी खूप बदलले आहे.
त्यांचे राजकीय रंग बघून,
कोड्यामध्ये तेरडा आहे.
रंग बदलले एवढे की,
आश्चर्यचिकित सरडा आहे.
जसे रंग बदलणे चालू आहे,
तसे रंग उधळणे चालू आहे !
इतरांचे राजकीय रंग बघून,
त्यांचेच खिदळणे चालू आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8627
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
19जुलै 2024

No comments:
Post a Comment