Wednesday, July 17, 2024

संधी आणि साधू...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

संधी आणि साधू

चक्क साधू सारखे साधूही,
आयती संधी साधायला लागले.
राजकारणाचेच बोधामृत,
एकमेकांना बोधायला लागले.

आपापले राजकारण साधायचा,
राजकीय पक्षांना मोका आहे.
साधू -साधू समोर प्रश्न उभा,
कुणाचा हिंदुत्वाला धोका आहे?

कुठे गेले प्रतिमांना तडे,
कुठे कुठे प्रतिमांना भेगा आहेत !
हिंदुत्वाला धोका दिल्याच्या,
आयत्या पिठावरून रेघा आहेत !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8625
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
17जुलै 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...