आजची वात्रटिका
--------------------------
पायाभूतची पेपरफुटी
केजी टू पीजी पर्यंतच्या,
पेपर फुटीला उत आहे.
पायाभूत चाचणीच्याही मागे,
पेपर फुटीचे भूत आहे.
पेपर फुटी अमर रहे...
जणू याचीच ही साईन आहे
ऑनलाइनच्या जमान्यात,
सगळेच ऑनलाईन आहे.
आपल्या शिक्षण व्यवस्थेला,
पेपर फुटीची घुस आहे !
सोशल मीडियाच्या सौजन्याने,
पेपर फुटीला फूस आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8624
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
16जुलै 2024
No comments:
Post a Comment