आजची वात्रटिका
--------------------------
मजबूरीचा अर्थ संकल्प
जेवढा खुशीत नितीश,
तेवढाच खुशीत चंद्रा आहे.
अर्थसंकल्पात न्हाऊन निघालेला,
बिहार सोबत आंध्रा आहे.
संकल्पाचा अर्थ लावण्याचे,
प्रत्येकालाच वेड आहे.
सरकारला दिलेल्या पाठिंबाची,
ही सढळ हस्ते फेड आहे.
एवढे समजले तरी बरे,
पाठिंबा किती महाग आहे ?
सरकारच्या मजबुरीचा अर्थ,
आपण समजून घेणे भाग आहे!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8632
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
24जुलै 2024

No comments:
Post a Comment