आजची वात्रटिका
--------------------------
गुरु आणि शिष्यांची कमाल
आम्ही काही कुणाचे कान भरीत नाहीत
आम्ही काय कुणाचे कान फुकत नाहीत.
गुरूंच्या चित्र विचित्र अनुभवावरून,
शिष्य काही कधीच धडा शिकत नाहीत.
गुरूंचे भव्य दिव्य चमत्कार,
भोळ्या भक्तांना वाटतात खरे आहेत.
अशा चमत्कारी गुरुपेक्षा,
रस्त्यावरचे जादूगार तरी बरे आहेत.
ज्याचे त्याचे गुरुत्व आणि शिष्यत्व,
ज्याला त्याला महत्त्वाचे वाटते आहे !
फसवा आणि फसवून घेण्यातच,
ज्याला त्याला समाधान भेटते आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8629
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
21जुलै 2024
No comments:
Post a Comment