Saturday, July 20, 2024

सर्व्हर डाऊन ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

सर्व्हर डाऊन

कधी तिचा सर्व्हर डाऊन होतो,
कधी त्याचा सर्व्हर डाऊन होतो.
जशी ती कधी कधी कावून जाते,
तसा तोही कधी कधी कावून जातो.

एकदा सर्व्हर डाऊन झाला की,
त्यांची ऑपरेशन सिस्टीम हँग होते.
त्याची थापोलॉजी सुरू झाली की,
तीसुद्धा खुशाल वेड्याचे सोंग घेते.

सिस्टीम रिकव्हर करण्यासाठी,
सगळे बॅकअप मिळावे लागतात !
सर्व्हर डाऊन होऊ नये म्हणून,
दोघांना प्रोटोकॉल पाळावे लागतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8628
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
20जुलै 2024
 

No comments:

daily vatratika...4april2025