Friday, July 26, 2024
पुण्याचा पाऊस...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
--------------------------
पुण्याचा पाऊस
पाऊसही म्हणू लागला,
पुणे तिथे काय उणे?
माझे काम मी करतोय?
कशाला काढू उणेदुणे?
जे काही करायचे आहे,
ते निसर्गाच्या मार्गाने होऊ द्या.
आडवे याल तर याद राखा,
मला माझ्या मार्गाने वाहू दे.
करायचा तो विकास करा,
निसर्गाच्या नादाला लागू नका!
धड्यावर धडे शिकवूनही,
पुन्हा वेड्यासारखे वागू नका!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8634
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
26जुलै 2024
Subscribe to:
Post Comments (Atom)
दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54
दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...

-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...
No comments:
Post a Comment