Tuesday, July 30, 2024

उलट तपासणी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

उलट तपासणी

कायदा आणि सुव्यवस्थेवर,
तेव्हाच खरी कोटी केली जाते.
जेव्हा माजी गृहमंत्र्यालाही,
म्हणे इथे दमदाटी केली जाते.

कोट्या करण्यासाठी खूप आहे,
कोट्या करण्यासाठी खूप होते.
विरोधक उलट तपासणी घेऊ लागले,
सांगा तेव्हा का गृहमंत्री चूप होते ?

माजीचा आजीवर;आजीचा माजीवर,
अगदी उघड उघड हल्लाबोल आहे !
कायदा आणि सुव्यवस्थेचा,
दोन्हीकडून वाजवलेला ढोल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8638
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
30जुलै 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...