Thursday, July 11, 2024

गोंधळाचे स्वातंत्र्य....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

गोंधळाचे स्वातंत्र्य

लोकशाहीच्या सभागृहात,
एकमेकांना पुरून उरू शकतात.
फक्त विरोधकच नाही तर,
सत्ताधारीही गोंधळ करू शकतात.

सभागृहात गोंधळ घालण्याचे स्वातंत्र्य,
लोकशाहीने सर्वांनाच दिलेले आहे.
गोंधळाचे प्रमाण कमी असले तरी,
हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे.

कुणी कुणासमोर गीता वाचायची?
हा प्रश्न खोचक पण खरा आहे !
सगळेच एकमुखाने म्हणू लागले,
फक्त आमचाच गोंधळ बरा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8619
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
11जुलै 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...