Sunday, July 28, 2024

पक्षांतराचे चक्र ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

पक्षांतराचे चक्र

राजकीय पक्षांतराचे प्रकार,
अगदी नित्य नियमित झाले आहेत.
राजकीय पक्षांतरासाठी,
त्यांना कितीतरी पर्याय खुले आहेत.

फिरून फिरून त्याच पक्षात आले की,
पक्षांतराचे चक्र पूर्ण होऊन जाते.
पृथ्वी गोल असल्याची प्रचितीही,
आपल्या सगळ्यांनाच येऊन जाते.

कुणाच्याच पक्षांतराचे सुख दुख नको,
त्यामुळेच लोकशाही प्रगल्भ होते आहे!
पक्षांतरामुळेच कॉकटेल विचारधारा,
लोकशाहीत उदयाला येते आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8636
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
28जुलै 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 16सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 108 वा

दैनिक वात्रटिका l 16सप्टेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 108 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1ZJ-teI8ofC940rJZ_a...