Sunday, July 7, 2024

प्रचाराचा सल्ला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

प्रचाराचा सल्ला

काम कमी करूनसुद्धा,
जादा करून सांगता आले पाहिजे.
विरोधकांच्या विरोधालासुद्धा,
वेशीवरती टांगता आले पाहिजे.

या राजकीय सल्ल्यामधून,
तुम्ही बरेच काही शिकू शकता.
अगदी गव्हाच्या भावामध्ये,
तुमचे बरबडेही विकू शकता.

विचार बिचार सोडून द्या,
प्रचाराच्या तंत्रावरती स्वार व्हा !
वितभर करा; हातभर सांगा,
प्रचाराच्या मंत्रावरती स्वार व्हा !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8615
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
7जुलै 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...