आजची वात्रटिका
--------------------------
आरक्षणाचा चेंडू
आरोप प्रत्यारोप करीत करीत,
त्यांची बुकला बुकली चालली आहे.
यांच्या कोर्टातून त्यांच्या कोर्टात,
आरक्षणाची ढकलाढकली चालली आहे..
आरक्षणावर लोकसभा पार पडली,
आता पुन्हा विधानसभेचा नंबर आहे.
आरक्षणाच्या बाजूने आणि विरोधात,
ज्याने त्याने कसलेली कंबर आहे.
कुणाची तळ्यात;कुणाची मळ्यात,
कुणाची मिरचीच्या खळ्यात आहे !
प्रत्येकाची आरक्षण भूमिका अशी की,
आपला विरोधक जाळ्यात आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8639
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
31जुलै 2024
No comments:
Post a Comment