Saturday, March 4, 2023

गॅस ट्रबल..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
गॅस ट्रबल
कधी खालून;कधी वरून,
महागाईच्या झळा आहेत.
गॅस सिलेंडरबरोबर पोटातही,
महागाईच्याच कळा आहेत.
गॅस सिलेंडरच्या दरवाढीला,
अपरिहार्यतेचे लेबल आहे !
जसे पावट्याचे निमित्त करीत,
हे अपचनीय गॅस ट्रबल आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6738
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
4मार्च2023
----------------------------------
मराठी वात्रटिका

 

Friday, March 3, 2023

गाईड म्हणाले पुस्तकाला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका



आठवणीतील वात्रटिका
------------------------
गाईड म्हणाले पुस्तकाला
गाईड म्हणाले पुस्तकाला,
तुझे आपले चांगले आहे.
आम्हांला मात्र दोरीवरती,
आयुष्यभर टांगले आहे.
परीक्षेचा मोसम आला की,
बाबा अंगावर काटा येतो.
पोरासाठी बापही मग,
पाहिजे तेवढ्या नोटा देतो.
आमची 'चिरफाड' करूनसुद्धा
उत्तरपत्रिका कोऱ्या असतात !
पोरासोबत बापाच्याही,
गुणवाढीसाठी फेऱ्या असतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-433
दैनिक झुंजार नेता
वर्ष -2रे
26 फेब्रुवारी2001

बुक्स ते नोटबुक्स..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

बुक्स ते नोटबुक्स

लवकरच शालेय बुक्स,
चक्क नोटबुक्स होणार.
दप्तराचे ओझे कमी झाले,
हे एकदाचे फिक्स होणार.

पुस्तकांचे चौभाजन होवून,
पुस्तकच वहीचे पान होणार.
पालकांच्या खिशाला मात्र,
दप्तराचा आर्थिक ताण होणार.

पाठीवरचे गेले;खिशावर आले,
असे खुशाल म्हणू शकतात!
पालकांबरोबर विरोधकही,
नव्या ओझ्याने कण्हू शकतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8191
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
3मार्च2023
 

विनंतीवजा इशारा.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

विनंतीवजा इशारा

सामान्य भारतीय माणसे,
आजकाल जोरात दचकू लागले.
एकमेकांच्या विरोधात,
नेते काहीच्या बाही पचकू लागले.

नेत्यांनी नेत्यांची इज्जत राखावी,
उगीच नको तेवढे ताणू नका !
सामान्य भारतीय माणसांवरती,
हक्कभंग करायची वेळ आणू नका!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6737
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
3मार्च2023
 

Thursday, March 2, 2023

चोर मचाये शोर...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

चोर मचाये शोर

चोऱ्या करून ते करून,
वर पुन्हा ते शिरजोर आहेत.
चोरांचे आणि महाचोरांचे
दरवेळी नवनवे शोर आहेत.

तरीही आपण कुणी,
चोरांना चोर म्हणायचे नाही.
आपणही कधी कुणी,
चुकूनही साव बनायचे नाही.

चोरांचा आणि महाचोरांचा,
हाच तर हाल हवाल आहे!
चोरांना चोर म्हणणे म्हणजे,
चोरांच्या इज्जतीचा सवाल आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8190
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
2मार्च2023
 

चोरमंडळ आणि हक्कभंग...मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
------------------------

चोरमंडळ आणि हक्कभंग

आखाडा म्हणा,फड म्हणा
पण चोरमंडळ म्हणू नका.
तुमचा वैयक्तिक रोष,
तुम्ही सभागृहात आणू नका.

देशद्रोहीला प्रत्युत्तर देताना,
महाराष्ट्रद्रोही म्हणू शकता.
देशद्रोह्यांपेक्षा चोर मोठे,
हा गर्भितार्थ तुम्ही जाणू शकता.

जिभेला लगाम लावायचा,
असा माझा ठाम चंग झाला!
तोपर्यंत तर बायको उत्तरली,
सभागृहाचा हक्कभंग झाला!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6736
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
2मार्च2023

Wednesday, March 1, 2023

खेळ मांडला...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

खेळ मांडला

आमदार,खासदार सोडून,
आता पक्षच पळवू लागले.
लोकशाहीच्या खेळण्याने,
लोकशाहीलाच खेळवू लागले.

लोकशाहीचे झाले खेळणे,
अनेक खेळविते धनी आहेत!
लोकशाहीचा खेळ मांडणारे,
सध्या तरी ज्ञानी आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8189
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
1मार्च2023
 

दमकोंडी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

दमकोंडी

वादावरती वाद झाले,
आळावरती आळ झाले.
कुऱ्हाडीचे दांडेच मग,
गोतासाठी काळ झाले.

जसे निकटचे दूर गेले,
तसे दूरचे निकट आले.
धनुष्यातून सुटले बाण,
सारेच बिकट झाले.

कधी फुटते डरकाळी,
कधी फक्त ओरड आहे!
इकडे आड,तिकडे विहीर,
घशाला मात्र कोरड आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6735
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
1मार्च2023
 

Tuesday, February 28, 2023

वैज्ञानिक दृष्टिकोन...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

वैज्ञानिक दृष्टिकोन

जिकडे बघावे तिकडे,
प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे.
आपण विज्ञानाला टाळू शकतो,
हे तर अज्ञान एके अज्ञान आहे.

तरी विज्ञानाला कुणी,
फारसे गांभीर्याने घेत नाही.
परीक्षेपुरते विज्ञान शिकून,
वैज्ञानिक दृष्टिकोन येत नाही.

तुम्ही विज्ञानाला कितीही टाळा,
विज्ञान टळले जात नाही!
विज्ञान जगल्याशिवाय,
वैज्ञानिक दृष्टिकोन येत नाही!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8188
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
28फेब्रुवारी 2023
 

पोटभरू...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

पोटभरू

आज जिकडे बघावे तिकडे,
सर्वत्र जातीपातीचे घोळके आहेत.
साधुसंत आणि महापुरुषांचे,
त्यांना मतलबी पुळके आहेत.

त्यांना आपला घोळका मोठा वाटतो,
जे जातीपातीच्या घोळक्यात आहेत.
आज साधूसंत आणि महापुरुष,
जातीपातीच्याच विळख्यात आहेत.

महापुरुषांच्याच विचारावरती,
आज आपली पोटे भरू लागले!
आपल्या उंच्या वाढविण्यासाठी,
महापुरुषांनाच छोटे करू लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6734
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
28फेब्रुवारी2023
 

Monday, February 27, 2023

बंडखोरीची कारणमीमांसा....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

बंडखोरीची कारणमीमांसा

बंडखोरीचा पराक्रम सांगायला,
ज्याला त्याला नवे स्फुरण आहे.
दर दोन-तीन दिवसाला,
बंडखोरीचे बदलते कारण आहे.

जशी बंडखोरींची कीर्ती,
एकतीस देशात पसरली आहे!
तशी बंडखोरीची कारणमीमांसा,
थेट जातीपर्यंत घसरली आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8187
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
27फेब्रुवारी 2023
 

मातृभाषा कर्तव्य...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

मातृभाषा कर्तव्य

माय मराठीचे पुत्र आम्ही,
आम्ही माय मराठीचे पांग फेडू.
माय मराठी बनवू ज्ञानभाषा,
आम्ही मराठी नव्या जगाशी जोडू.

जुन्याशी नवे जोडताना,
आम्ही नव्या तंत्रांची कास धरू.
अभिजाततेच्या आशेबरोबरच,
जागतिक भाषेची आस धरू.

शुद्ध-अशुद्धतेचा दुराग्रह सोडू,
आपण थोडे औरस चौरस होवू.
भाषिक अहंकार व द्वेष नको,
सारे भाषिक एकतेचे गीत गावू.

मराठी बाणा,मराठी संस्कृती;
समृद्ध वारसा सदैव पाठी ठेवू!
माय मराठीचा उमटवू ठसा,
आपण सारे ' सही ' मराठी होवू!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6733
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
27फेब्रुवारी2023
 

Sunday, February 26, 2023

नामांतराचा पाळणा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

नामांतराचा पाळणा

खूप वर्षे आणि दिवस गेले,
नामांतराचा पाळणा हालला.
हा आमाच पराक्रम आहे,
जो तो अभिमानाने बोलला.

कुणी केले कानात कुर्रर ss..
कुणी पाळण्याची दोरी ओढली.
कुणी वाटल्या घुगऱ्या,
कुणी नामांतराचीच री ओढली.

संभाजीनगर आणि धाराशिव,
नावाला वेगळाच भाव येतो आहे!
कुणी उखाणे घेऊन घेऊन,
घ्यायचे त्यांचेच नाव घेतो आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8187
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
26फेब्रुवारी 2023
 

दांभिकांची एकी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

दांभिकांची एकी

दांभिकांना दांभिक भेटले की,
दांभिकांची घट्ट अशी एकी होते.
मग दांभिकता आणि लबाडीच,
दांभिकांसाठी नेकी एके नेकी होते.

मग दांभिकता चेकाळू लागतात,
मग दांभिकता बोकाळू लागतात.
दांभिकतेला मान्यता मिळाली की
मग दांभिकही खेकाळू लागतात.

दांभिकांकडून दाभिकांकडे,
दांभिकतेची लागण होत जाते !
साथी हात बढाना साथी रे..
हेच दांभिकांचे स्लोगन होत जाते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6732
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
26फेब्रुवारी2023
 

Saturday, February 25, 2023

संभाजीनगर बोले धाराशिवला...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

संभाजीनगर बोले धाराशिवला

औरंगाबाद आणि उस्मानाबाद,
दोन्हीही नावे आता बाद झाली.
नामांतरांच्या सगळ्या लढ्यांची,
आम्हाला पुन्हा पुन्हा याद झाली.

कुणाला रुचेल;कुणाला पचेल,
कुणा कुणासाठी हा धक्का आहे!
अखेर राज्याच्या ठरावावरती,
केंद्राचा हुकमी शिक्का आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6731
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
25फेब्रुवारी2023
 

Friday, February 24, 2023

भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर

कुणी जसे आजी आहे,
तसे कुणी माजी आहे.
भावी मुख्यमंत्र्यांसाठीची,
जोरात बॅनरबाजी आहे.

जसा कुठे कुठे दादा आहे,
तशी कुठे कुठे ताई आहे.
जय..जय..जय..वंत..
असे बोलायची घाई आहे.

कार्यकर्त्यांची निष्ठा अशी,
धो धो धो धो वाहू लागली !
बॅनर कुणीही लावले तरी,
नेत्यांची पंचाईत होऊ लागली!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6730
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
24फेब्रुवारी2023
 

मुर्दाडशाही जिंदाबाद...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
मुर्दाडशाही जिंदाबाद
ही काही अंधश्रद्धा नाही,
हे अनुभव तर सतत येतात.
गावातले मेलेले माणसेही,
मतदानाला जिवंत होतात.
लोकशाहीचे अमृत असे,
मृत मतदारांना पाजले जाते.
मतदान केंद्रा केंद्रात मग,
भूतांचे थैमान माजले जाते.
मतदार नावाच्या मुडद्यांनी,
हे प्रकार वारंवार केलेले आहेत!
उघड्या डोळ्यांनी हे जे पाहतात,
ते जिवंत असून मेलेले आहेत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8185
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
24फेब्रुवारी 2023
----------------------------------
मराठी वात्रटिका

Thursday, February 23, 2023

जय कोडगे बाबा... मराठी वात्रटिका

 


कॉपीनामा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

कॉपीनामा

पेपर फुटला नाही तर,
परीक्षा परीक्षाच वाटत नाही.
कॉप्या केल्या नाहीत तर,
परीक्षेचे समाधान भेटत नाही.

विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांचाही,
कॉपीत सिंहाचा वाटा असतो.
बालकांना पालकांचा तर,
कॉपीसाठी सक्रीय रेटा असतो.

शहरातल्या विद्यार्थ्यांचा,
खेड्यांकडे प्रचंड ओढा आहे!
कॉपी मुक्ती मोहिमेचा,
केवळ पोपटपंची पाढा आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8184
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
23फेब्रुवारी 2023
 

गौप्यस्फोटाचे अन्वयार्थ...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

गौप्यस्फोटाचे अन्वयार्थ

ज्याला जसे पाहिजे तसे,
जो तो गौप्यस्फट घडवू लागला.
पहाटेचा शपथविधी,
महाराष्ट्राची झोप उडवू लागला.

पहाटेच्या शपथविधीचा,
गेमच जरी अजून ब्लाईंड आहे.
तरी गौप्यस्फोटच सांगू लागले,
याचा कोण मास्टर माईंड आहे?

कुणाचा गौप्यस्फोट खोचक आहे,
कुणाचा गौप्यस्फोट जाचक आहे!
झाले गेले गंगेला मिळाले तरी,
कुणाचा गौप्यस्फोट सूचक आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6729
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
23फेब्रुवारी2023
 

Wednesday, February 22, 2023

बोर्डाचा बोनस...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
बोर्डाचा बोनस
बारावी इंग्रजी प्रश्नपत्रिकेवरतीच,
छोटी उत्तरपत्रिका छापली गेली.
इज्जतीचा प्रश्न उभा राहिला,
त्यांची गेली का? आपली गेली?
प्रश्नांची उत्तरे लिहिण्याबरोबरच,
उत्तरे तपासण्याच्याही सूचना दिल्या.
गाईने उत्तर पत्रिका खाल्ल्याच्या,
अजून तरी कुठे गोष्टी जुन्या झाल्या?
विद्यार्थी पडले गोंधळात,
परीक्षा मंडळाचा काय मानस आहे?
विद्यार्थ्यांनो खुशखबर ही की,
नक्कीच तुम्हाला हा बोनस आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------
मराठी वात्रटिका

व्हीप गेला उडत....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

व्हीप गेला उडत....

नवरा बायकोचे वाद,
नको तेवढे वाढले गेले.
ताणता ताणता तुटून,
वेगवेगळे गट पडले गेले.

नवरा बायकोला ओरडला,
माझा व्हीप पाळावा लागेल.
बायको ठसक्यात उत्तरली,
माझा कसा टाळावा लागेल?

ताणाताणी वादावादीनंतर,
दोघांनीही समायोजन केले!
दोघांनीही मग आपले गट,
एकमेकांमध्ये विलीन केले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6728
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
22फेब्रुवारी2023
 

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...