Monday, March 5, 2012

मंगळ मंगळ हो!


पत्रिका बघणार्‍यांची
अधिकच चंगळ आहे.
आज पृथ्वीच्या जवळ
ग्रहमालेतला मंगळ आहे.

आकाशातले सारे ग्रह
पत्रिकेमध्ये आणले जातात.
पत्रिका बघणार्‍यांकडून
ढगात गोळ्या हाणल्या जातात.

सर्वानाच कळून चुकले आहे
त्यांचे काय हेतू असतात!
अंगठीबहाद्दरांच्या मागेच
राहू आणि केतू असतात!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)



-

1 comment:

अमोल केळकर said...

मस्त मस्त !!

( मंगळ बघणारा ) अमोल केळकर

www.kelkaramol.blogspot.com

daily vatratika...11april2025