Sunday, March 11, 2012

प्राथमिक जबाबदारी

आयात-निर्यातीच्या धोरणामागे
जागतिक कारण आहे.
शेतकर्‍यांचे आयुष्य मात्र
सरकारकडे तारण आहे.

पिकांची निर्यात करा,
नाहीतर आयात करा !
पण शेतकर्‍यांच्या आत्महत्या
आपल्या कह्यात करा !!




- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...