Wednesday, March 7, 2012

महागाईची नाळ

पेट्रोल चढाईच्या तयारीत,
कापसाचे भाव पडू लागले.
उत्तर प्रदेशाचा 'निकाल ' लागताच
अपेक्षित तेच घडू लागले.

निवडणुकांशी घट्ट जोडलेली
महागाईची नाळ आहे!
युपीत 'मुलायम' असला तरी
इतरांसाठी कठीण काळ आहे!!


- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

1 comment:

निसर्गवार्ता said...

वा! छान आहे वात्रटिका !

नाराजी नाट्य....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नाराजी नाट्य त्यांनाही म्हणे कशाचीच खंत नाही, यांनाही म्हणे कशाचीच खंत नाही तरीही राजकीय नाराजी नाट्याला,...