आजची वात्रटिका
----------------------------
साईड इफेक्ट
कुणाचा पायात पाय आहे,
कुणाचा हातात हात आहे.
ज्याने ठेवला भाबडा विश्वास,
त्याचाच विश्वासघात आहे.
कालपर्यंत वाटत होते,
जो जो कुणी आपला आहे.
आपल्याच वाईटावर,
नेमका तोच आज टपला आहे.
सारेच झाले राजकारणी,
त्यांच्या राजकीय टॅक्ट आहेत!
विश्वासघातकी राजकारणाचे,
हे सारे साईड इफेक्ट आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9431
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
18ऑक्टोबर 2026
