Tuesday, October 10, 2023

सामाजिक अवस्था...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सामाजिक अवस्था

कुणी मेले काय?कुणी जगले काय?
लोकांनाही कशाचे काही वाटत नाही.
कितीही टाहो ऐकले तरी,
कुणाला हुंदकाही सुद्धा फुटत नाही.

जणू काय आजकाल लोकांची,
सगळी संवेदनशीलता मेली आहे !
रोजचेच मढे त्याला कोण रडे,
यामुळेच ही अवस्था झाली आहे !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8377
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
10ऑक्टोबर2023
 

Monday, October 9, 2023

दैनिक वात्रटिका9ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -126वा


दैनिक वात्रटिका
9ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -126वा 
अंक डाऊनलोड लिंक -

काल्पनिक आनंद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

काल्पनिक आनंद

जेव्हा गट तट वाढू लागतात,
जेव्हा पक्ष फटाफट फुटू लागतात.
तेव्हा अनेक भावी मुख्यमंत्री,
कल्पित आनंद लुटू लागतात.

कल्पना ही कल्पनाच असते,
याचेही सर्वांनाच ज्ञान आहे !
लोकांना अभिमान वाटायला हवा,
आपल्याकडे केवढी खाण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8376
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
9ऑक्टोबर2023
 

Sunday, October 8, 2023

दैनिक वात्रटिका8ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 125वा


दैनिक वात्रटिका
8ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 125वा 
अंक डाऊनलोड लिंक -

वेट अँड वॉच...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
वेट अँड वॉच
आधी ते काय म्हणाले होते?
हे मुळीच कुणी आठवू नका.
आता मात्र म्हणू लागले,
आमचे चिन्ह गोठवू नका.
काल वेगळी;आज वेगळी,,
भूमिकेवर प्रश्नचिन्हं आहेत.
वाढत्या गोंधळाने मात्र
कार्यकर्ते तर सून्न आहेत.
काका वरचा बाका प्रसंग,
दादा मुळेच बेतला आहे !!
ताई अगदी खात्रीने म्हणाल्या,
आयोगाचा पेपर फुटला आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8375
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
8ऑक्टोबर2023

 

Saturday, October 7, 2023

दैनिक वात्रटिका7ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 124वा


दैनिक वात्रटिका
7ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 124वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

दुश्चिन्ह....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

दुश्चिन्ह

पक्षीय दावेदारीचे,
प्रकरण पेटू लागले.
एक एक पक्ष चिन्ह,
हळूहळू गोठू लागले.

एक गट खरा तर,
दुसरा गट भोंदू आहे.
निवडणूक आयोगाकडे,
चिन्हांचा गोठणबिंदू आहे.

दोघांच्या भांडणांमध्ये,
तिसऱ्याचाच लाभ आहे !
आयोगाचा निकाल,
चिंताजनक बाब आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8374
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
7ऑक्टोबर2023
 

Friday, October 6, 2023

दैनिक वात्रटिका 6ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 123वा


दैनिक वात्रटिका
6ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 123वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

मुख्यमंत्री बदलाची चर्चा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मुख्यमंत्री बदलाची चर्चा

चर्चा एवढ्या खमंग होतात की,
त्यांचा कधीच अंत होत नाही.
मुख्यमंत्री बदलाची चर्चा,
त्यामुळे कधीच शांत होत नाही.

एकाने चर्चेला पूर्णविराम देताच,
दुसरे प्रश्नचिन्ह निर्माण करतात.
आपले होते मनोरंजन,
कुणी कुणी मात्र बकध्यान करतात.

ज्यांना व्हायचे असेल त्यांनी व्हावे,
ज्याला बसवायचे त्याला बसवा हो !
हम सब एक है....
लोकांच्या मनावर हे ठसवा हो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8373
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
6ऑक्टोबर2023
 

Thursday, October 5, 2023

दैनिक वात्रटिका5ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 122वा


दैनिक वात्रटिका
5ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 122वा 
अंक डाऊनलोड लिंक -

चमत्कारांची भुरळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

चमत्कारांची भुरळ

चमत्काराला नमस्कार करणे,
हीच तर दुनियेची रीत आहे.
आंधळेपणाने विश्वास ठेवणे,
यावरतीच दुनियेची प्रीत आहे.

चमत्काराने डोळे दीपत नाहीत,
चमत्काराने डोळे आंधळे होतात.
एकदा लोक गोंधळून गेले की,
चमत्काराने तेच वेंधळे होतात.

लोकांवर भुरळ घालण्यासाठी,
चमत्कार ही एक संधी असते !
चमत्कार म्हणजे हातचलाखी,
चमत्कार म्हणजे नजरबंदी असते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8372
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
5ऑक्टोबर2023
 

Wednesday, October 4, 2023

कारखान्यांची शुगर

आजची वात्रटिका
-------------------------

कारखान्यांची शुगर

कधी शुगर कमी होते,
कधी शुगर वाढते आहे.
साखर कारखाने आजारी,
हे नेहमीच घडते आहे.

सरकारी इन्सुलिनवर,
कारखाने वाचू लागतात !
सहकारी तत्त्वावर
साखर सम्राट नाचू लागतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3 रे
4ऑक्टोबर2023
---------------------------
मराठी वात्रटिका
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करा.
२)सदरील वात्रटिकमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला कळवा.
३) वैयक्तिक अभिप्रायाचे स्वागत.
जे वात्रटिका शेअर करत आहेत त्यांचे विशेष आभार.
4) माझ्या प्रसिद्ध असलेल्या 18 हजारांपेक्षा जास्त वात्रटिका 8 हजार पेक्षा जास्त वात्रटिका एका क्लिकवर वाचू शकता
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
५) माझ्या बाल वात्रटिका वाचण्यासाठी क्लिक करा
https://balsuryakanti.blogspot.com
६) सर्व काही एकाच ठिकाणी...एकाच ठिकाणी !! अर्थात *सप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
7) माझ्या *सूर्यकांती लाईव्ह* किंवा यूट्यूब चॅनलला कृपया भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
8 )आजपर्यंतचे सर्व वात्रटिका संग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
https://vatratikaebooks.blogspot.com
९)माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी क्लिक करा
https://surykanti.blogspot.com
१०) माझ्या विडंबन कविता वाचण्यासाठी किलक करा
https://suryakanti1.blogspot.com
प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-सूर्यकांत डोळसे
4ऑक्टोबर2023

नाराजी नाट्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

नाराजी नाट्य

नाराजी ही नाराजीच असते,
कधीच तिचा साधा डंख बसत नाही.
कुठल्याही नाराजी नाट्याला,
त्यामुळेच शेवटचा अंक असतं नाही.

जिथे पडदा पडल्यासारखा वाटतो,
तिथेच पुन्हा नवा अंक सुरू होतो.
जसे अंक वाढत जातील तसे,
नाराजीचा नवा डंख सुरू होतो.

नाराजी कितीही लपविली तरी,
नाराजी कधीच लपली जात नाही !
आपण नाराज नसल्याची पुडी,
कुणाकडूनच खपली जात नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8371
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
4ऑक्टोबर2023
 

दैनिक वात्रटिका 4ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 121वा

दैनिक वात्रटिका
4ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 121वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

Tuesday, October 3, 2023

दैनिक वात्रटिका...3ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 120वा


दैनिक वात्रटिका
3ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 120वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

मिस टाइमिंगचे राज...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
मिस टाइमिंगचे राज
कालही आवाज मोठा होता,
आजही आवाज मोठा आहे.
डीजे विरुद्धचा गदारोळ,
तरी कसा म्हणावे खोटा आहे?
दहीहंडी गेली, गणपती गेला,
तोंडावरती नवरात्री आहे.
डीजे समर्थक विरोध करतील,
याची आम्हाला खात्री आहे.
डीजे बंद झालीच पाहिजेत,
ही मागणी रास्त असू शकते !
पण प्रांतवादाचे राजकारण,
डीजेच्या आवाजात दिसू शकते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3 रे
3ऑक्टोबर2023

 

कावळ्यांची टंगळ मंगळ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

कावळ्यांची टंगळ मंगळ

एकाच कुटुंबात होणारे पित्र,
अनेक ठिकाणी होऊ लागले.
विभक्त कुटुंब पद्धतीमुळे,
पितृ अनेक ठिकाणी जेवू लागले.

हे सगळे विभक्त कुटुंब चित्र,
कावळ्यांना पहावे लागत आहे.
एकाच पित्राच्या पिंडाला,
अनेक ठिकाणी शिवावे लागत आहे.

पित्रांबरोबर कावळ्यांचीही
हल्ली पितृपाठात चंगळ आहे !
त्यामुळेच पिंडाला शिवण्याची,
कावळ्यांची टंगळ मंगळ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8370
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
3 ऑक्टोबर2023
 

Monday, October 2, 2023

दैनिक वात्रटिका2ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 119वा


दैनिक वात्रटिका
2ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 119वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

तलवार ते वाघनखे....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

तलवार ते वाघनखे

आधी चर्चेत होती भवानी तलवार,
आता चर्चेत वाघनखे आहेत.
जसे कुणी उल्हासित आहेत,
तसे कुणी कुणी पोटदुखे आहेत.

कुणी पराक्रमाचे 'डफ' वाजतोय,
कुणी तुताऱ्या फुंकायला लागले !
वाघ नखांच्या अस्सलतेवरती,
कुणी कुणी शंकायाला लागले.

तलवार आणा;वाघनखे आणा,
सगळाच पराक्रमाचा वारसा आहे !
तुम्ही एकमेकांना जो दाखवताय,
तो राजकारणाचा आरसा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8369
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
2 ऑक्टोबर2023
 

Sunday, October 1, 2023

नथुरामचे उदात्तीकरण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
नथुरामचे उदात्तीकरण
अजूनही डोक्यावर घेवून,
नथुराम नाचवला जातो.
अजूनही जिकडे तिकडे,
नथुराम‘ पोचवला जातो.
कुणसाठी नथुराम आयडॉल,
कुणासाठी नथुराम आँधी आहे !
पण एक गोष्ट विसरू नका,
शेवटी गांधी हा गांधी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3 रे
1ऑक्टोबर2023

 

दैनिक वात्रटिका1 ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 118वा


दैनिक वात्रटिका
1 ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 118वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

राजकीय सोय...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय सोय

यांची इकडे कल्टी आहे,
त्यांची तिकडे कल्टी आहे.
कालच्या आपल्या भूमिकांची,
एकदमच टांगा पलटी आहे.

काल जे सरळ वाटायचे,
तेच आज वाकडे आहेत.
कालच्या आपल्या भूमिकांशी,
त्यांचे छत्तीसचे आकडे आहेत.

काल ज्याला नको म्हणत होते,
त्यासाठीच आज त्यांचे होय आहे !
कसल्या भूमिका कसले काय?
सर्वांचीच ही राजकीय सोय आहे

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8368
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
1ऑक्टोबर2023
 

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...