Thursday, September 14, 2023

दैनिक वात्रटिका14सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 101वा


दैनिक वात्रटिका
14सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 101वा
अंक डाऊनलोड लिंक -
 

बैलांचा संवाद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बैलांचा संवाद

जसा कोरोनाचा माणसांवर,
तसा लंपीचा आपल्यावर डोळा आहे.
सोशल डिस्टन्सिंगच्या सावटाखाली,
पुन्हा एकदा यंदाचा बैलपोळा आहे.

जेव्हा माणसांवरती कोरोनाचे,
जीवघेणे संकट बेतलेले होते.
तेव्हा माणसांनीही आपल्यासारखे,
नाका-तोंडाला मुंगसे घातलेले होते.

जान सलामत तो पोळे पचास,
सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागेल !
वासरात एखादी शहाणी दिसली तरी,
तिलाही जाणीवपूर्वक टाळावे लागेल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8355
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
14सप्टेंबर2023
 

Wednesday, September 13, 2023

दैनिक वात्रटिका13सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 100वा


दैनिक वात्रटिका
13सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 100वा
अंक डाऊनलोड लिंक -
 

राजकीय संन्यास...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय संन्यास

राजकीय संन्यासाची,
आव्हानात्मक भाषा आहे.
आव्हानाच्या वाक्याला,
टाळ्या आणि हश्या आहे.

संन्यासाच्या आव्हानाला,
जर तरच्या अटी आहेत !
ठक आणि महाठकाच्या,
सतत गाठीभेटी आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8354
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
13सप्टेंबर2023
 

हवामान तज्ञ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
हवामान तज्ञ
पावसाचा अंदाज सांगायची,
ज्याला त्याला भलतीच हौसआहे.
स्वयंघोषित हवामान तज्ञांचा,
सर्वत्र पाऊसच पाऊस आहे.
पाऊस तो पाऊसच,
त्याचा तर कधीच नेम नसतो.
सगळ्या हवामान तज्ञांचा,
अंदाजसुद्धा कधीच सेम नसतो.
अंदाज हुकले आणि चुकले तरी,
जबाबदारीशी घेणे देणे नाही!
असले हवामान तज्ञ तर,
जगामध्ये कुठेच होणे नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6917
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -13सप्टेंबर2023

 

Tuesday, September 12, 2023

दैनिक वात्रटिका12सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 99वा


दैनिक वात्रटिका
12सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 99वा
अंक डाऊनलोड लिंक -

 

कळतय पण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

कळतय पण...

जेव्हा समाजकारणात,
राजकारणात घुसले जाते.
सगळ्याच प्रकरणाचे ,
मग पार वांगे वासले जाते.

वांगे वासाण्याचे कारण,
सगळ्यांनाच नडले जाते.
आशावेली वड्याचे तेलसुद्धा,
चक्क वांग्यावर काढले जाते.

त्यामुळेच तर सगळ्यांना,
कळूनसुद्धा वळत नाही !
सुंभ जळाला तरी,
पिळ मात्र जळत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8353
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
12सप्टेंबर2023
 

सेम टू सेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सेम टू सेम

चित्रपट आणि राजकारण,
दोन्हीही खूपच इक्वल असतात.
चित्रपटाप्रमाणे राजकारणातही,
सिक्वल एके सिक्वल असतात.

चित्रपटात आणि राजकारणात,
जसे हिरो सोबत व्हिलन असतात.
तसे शेवट चांगला करण्यासाठी,
दोन्हीकडेही मनोमिलन असतात.

राजकारणात फिल्मी मसाला,
चित्रपटात डर्टी पॉलिटिक्स असते !
फादरच गॉडफादर असले की,
दोन्हीकडे घराणेशाही फिक्स असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6918
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -12सप्टेंबर2023
 

Monday, September 11, 2023

दैनिक वात्रटिका11सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 98वा


दैनिक वात्रटिका
11सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 98वा
अंक डाऊनलोड लिंक -
 

गटबाजी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गटबाजी

कुणी जुन्या गटात आहेत,
कुणी नव्या गटात आहेत.
आपणच खरे असल्याच्या,
सगळेच थाटात आहेत.

आपल्या खरेपणाचे,
पुराव्यावर पुरावे आहेत.
जुन्या आणि नव्या गटात,
दुराव्यावर दुरावे आहेत.

कुणासाठी दरवाजे उघडे,
कुणाचे दरवाजे बंद आहेत !
मांजरीला वाटू लागते,
इथले सगळेच अंध आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8352
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
11सप्टेंबर2023




Sunday, September 10, 2023

दैनिक वात्रटिका10सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 97 वा


दैनिक वात्रटिका
10सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 97 वा
अंक डाऊनलोड लिंक -
 

बदमाशी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बदमाशी

इथे प्रत्येकाने खोदलेला,
दुसऱ्यासाठी खड्डा आहे.
राजकारण म्हणजे तर,
बदमाशांचा शेवटचा अड्डा आहे.

इथे एकमेकांच्या हातावर,
एकमेकांची जाहीर तुरी आहे.
याचा अर्थ एकच झाला,
राजकारण ही बदमाशगिरी आहे.

राजकारण आणि बदमाशी,
हा एकमेकांचा श्वास आहे !
आपण फक्त ओळखायचे,
कोण जास्त बदमाश आहे?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8351
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
10सप्टेंबर2023
 

निरक्षरतेची शोधाशोध...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

निरक्षरतेची शोधाशोध

किती अभियानं आले गेले,
भारत साक्षर झाला नाही.
अगदी शंभर टक्के रिझल्ट,
कधीच हाती आला नाही.

प्राथमिक शिक्षकांच्या गळ्यात,
सगळी अभियान पडू शकतात.
आजचे निरक्षर शोधता शोधता,
भावी निरक्षरही वाढू शकतात.

खाजगीकरणाची खाज,
जर सर्वच क्षेत्रात वाढते आहे.
मग अभियानांच्याच बाबतीत,
हे धोरण सांगा कुठे नडते आहे?

कोणतेही अभियान आले की,
तिथे फक्त शिक्षकांचे मरण आहे!
निरक्षरांचे प्रमाण वाढण्याचे,
खरे हेच तर मोठे कारण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6917
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -10सप्टेंबर2023

 

Saturday, September 9, 2023

दैनिक वात्रटिका9सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 96 वा


दैनिक वात्रटिका
9सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 96 वा
अंक डाऊनलोड लिंक -
 

नामहरण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

नामहरण

नामांतर पाहिले होते,
नाम विस्तारही पाहिला होता.
फक्त नामहरण करणे,
एवढाच प्रकार राहिला होता.

इंडिया ऐवजी भारत,
हे त्याचेच तर उदाहरण आहे !
ना नामांतर ना नामविस्तार,
हे तर इंडियाचे नामहरण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8351
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
9सप्टेंबर2023
 

राजकीय आबादानी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय आबादानी

कुणी राजकारण करू नका,
असे तोंडापूरते म्हटले जाते.
राजकारणाचे आग्या मोहोळ तर,
त्यांच्याकडूनच उठले जाते.

करणारे आणि नको म्हणणारे,
सर्वच राजकारण करू लागतात.
आपला राजकीय मतलब,
जसा जमेल तसा पेरू लागतात.

राजकीय मतलबाच्या पेरणीवर,
पंचवार्षिक पीक काढले जाते!
त्यांची होते राजकीय आबादानी,
समाजकारण मात्र सडले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6916
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -9सप्टेंबर2023
 

Friday, September 8, 2023

दैनिक वात्रटिका8सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 95 वा


दैनिक वात्रटिका
8सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 95 वा
अंक डाऊनलोड लिंक -
 

दहीहंडी 2023....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

दहीहंडी 2023

कुणी भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडली,
कुणी निष्ठेची दहीहंडी फोडली होती.
धार्मिक उत्सवात राजकीय गोविंदांची,
सगळीकडेच एक धांदल उडली होती.

वन नेशन,वन इलेक्शनच्या चर्चेत,
जिथे वार्ड,तिथे दहीहंडी फुटत गेली.
आगामी निवडणुकांच्या प्रचाराची,
दाट शंकाही जिथे तिथे चाटत गेली.

प्रो......गोविंदा.... प्रो......
दहीहंडीला राजकीय तडका होता !
डीजेच्या तालाबरोबर दहीहंडीला,
सेलिब्रिटींचाही एकच भडका होता !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6915
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -8सप्टेंबर2023
 

Thursday, September 7, 2023

दैनिक वात्रटिका7सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 94वा


दैनिक वात्रटिका
7सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 94वा
अंक डाऊनलोड लिंक -
 

संधी साधू...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

संधी साधू

जसे तवा तापलेला दिसला की,
कुणीही आपल्या पोळ्या भाजून घेतो.
तसे आयते अंथरूण दिसले की,
कुणीही अंथरुणावर निजून घेतो.

आयत्या अंथरुणाचा अंदाज न घेता,
वाट्टेल तसे पाय पसरले जातात.
बुडत्याचा पाय नेहमीच खोलात,
तरीही नको तिथे घसरले जातात.

अशावेळी फुकटचे फौजदारही,
चोर सोडून संन्यासाला फाशी देतात!
लोण्याचा गोळ्यावर बोके टपले की
माकडं आयती संधी कशी घेतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8349
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
7सप्टेंबर2023
 

झुंडशाही....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

झुंडशाही

झुंडशाही म्हणजे लोकशाही,
सोयीस्कर अर्थ घ्यायला लागले.
लोकशाहीचे रूपांतर,
झुंडशाहीमध्ये व्हायला लागले.

त्यांचा तेवढा दबाव वाढतो,
ज्यांची जेवढी मोठी झुंड आहे.
ते बोलतात उठावाची भाषा,
कुणाची गद्दारी,कुणाचे बंडआहे.

झुंडीत जास्त डोके असले तरी,
झुंडीला मात्र डोके असत नाही !
झुंडशाही म्हणजेच लोकशाही,
यावरती विश्वासच बसत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6914
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -7सप्टेंबर2023
 

Wednesday, September 6, 2023

हक्क आणि कर्तव्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

हक्क आणि कर्तव्य

आरक्षणाच्या लढाया,
जातीय लढाया होवू लागल्या.
हम सब एक है...
सगळ्या बढाया होऊ लागल्या.

एकीचे बळ मिळते फळ,
हे जरी त्रिवार सत्य आहे !
हक्काबरोबर कर्तव्यही पाळावे,
एवढे तरी कुठे पथ्य आहे ?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8348
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
6सप्टेंबर2023
 

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...