Saturday, November 30, 2024

दैनिक वात्रटिका l 30नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 181 वा..



दैनिक वात्रटिका l 30नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 181 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 


मूळ व्याधी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

--------------------------

मूळ व्याधी

पैसे वाटणारे जेवढे हरामखोर,
तेवढेच घेणारेही हरामखोर आहेत.
पैसे देणारे चोर असतील तर,
पैसे घेणारेही नक्की महाचोर आहेत.

चोरांना महाचोर सामील असतील तर,
चोरी झाली म्हणण्यात काही अर्थ नाही.
त्यांनाच बोंबाबोंब करण्याचा हक्क आहे,
ज्यांच्यामध्ये कसलाही स्वार्थ नाही.

सलेक्शनपासून इलेक्शनपर्यंत,
अगदी सगळीकडे सारखीच बोंब आहे !
सर्वांची मूळ व्याधी अशी की,
सगळ्यांमध्येच स्वार्थाचा कोंब आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8755
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
30 नोव्हेंबर2024

Friday, November 29, 2024

दैनिक वात्रटिका l 29नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 180 वा


दैनिक वात्रटिका l 29नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 180 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

मुख्यमंत्री पदाची स्पर्धा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

मुख्यमंत्री पदाची स्पर्धा

कुणाला बाहेर काढले होते,
कुणी स्वतःच बाहेर पडले होते.
मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावाचून,
जनतेचे तरी कुठे अडले होते?

स्पर्धेमध्ये स्पर्धक नसतानाही,
मुख्यमंत्रीपदाची चर्चा रंगली गेली.
विरोधकांना निवडणूक वाईट,
सत्ताधाऱ्यांना मात्र चांगली गेली.

जो स्पर्धेमध्ये कधीच नव्हता,
नेमकी त्यानेच बाजी मारली आहे !
नेतृत्व वेगळे;चेहरा वेगळा?
ही शंका ती शंकाच उरली आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8754
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
29 नोव्हेंबर2024
 

Thursday, November 28, 2024

दैनिक वात्रटिका l 27नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 178 वा

दैनिक वात्रटिका l 27नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 178 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

समदुःखी कार्यकर्ते....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

समदुःखी कार्यकर्ते

कार्यकर्ता कुणाचाही असला तरी,
त्यांना एकमेकांची कदर असते.
निवडणुकीनंतरची आपली कहाणी,
एकमेकांच्या पुढे सादर असते.

नेत्यांबरोबर इमान राखणारे,
बेईमान तर बापाशी असतात.
कालपर्यंत जे तुपाशी होते,
निवडणुकीनंतर ते उपाशी असतात.

सगळ्या कार्यकर्त्यांची दुःख सारखेच,
जरी त्यांची वेगवेगळी पार्टी असते !
कार्यकर्ते नावाची सगळी जमात,
जेवढी अमाप तेवढीच खुरटी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8753
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
28 नोव्हेंबर2024


Wednesday, November 27, 2024

दैनिक वात्रटिका l 26नोव्हेंबर2024 वर्ष- चौथे अंक - 177 वा


दैनिक वात्रटिका l 26नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 177 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

ईव्हीएम आहे साक्षीला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

ईव्हीएम आहे साक्षीला...

वरुड वरून गोड दिसले तरी,
आतून काड्या केल्या जातात.
राजकीय खोड्या करून करून,
पाडा-पाड्या केल्या जातात.

प्रत्यक्ष शत्रूचासुद्धा हात,
अंधारातून धरला जातो.
पाडा-पाड्या करून करून,
काटा बाजूला सारला जातो.

जमेल तशा;जमेल तिथे,
बरोबर खुट्ट्या मारल्या जातात !
म्हणूनच मतदान यंत्रांकडून,
शिट्ट्यावर शिट्ट्या मारल्या जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8752
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
27 नोव्हेंबर2024
 

Tuesday, November 26, 2024

दैनिक वात्रटिका l 26नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 177 वा


दैनिक वात्रटिका l 26नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 177 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

मोसमी मुख्यमंत्री ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

मोसमी मुख्यमंत्री

मित्रांकडूनच मित्रांना,
मुख्यमंत्री पदासाठी खोडा आहे.
पाठीशी प्रचंड बहुमत असूनही,
मुख्यमंत्री पदाचा तिढा आहे.

सध्याचा फॉर्मुला तरी,
एक फुल;दोन हाफ आहे.
पण कोण कुठे बसणार?
हे चित्र तरी कुठे साफ आहे ?

डावे-उजवे करायचे नसेल तर,
मोसमी मुख्यमंत्री झाले पाहिजेत !
एका ऋतुला एक मुख्यमंत्री,
असे तीन मुख्यमंत्री केले पाहिजेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8751
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
26 नोव्हेंबर2024
 

Monday, November 25, 2024

दैनिक वात्रटिका l 25नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 176 वा

दैनिक वात्रटिका l 25नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 176 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

अपप्रचाराचा पॅटर्न...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अपप्रचाराचा पॅटर्न

एकाच्या यशाने दुसऱ्याला,
अपप्रचार करायला कटिबद्ध केले.
अपप्रचाराने निवडणुक जिंकता येते.
लोकसभेनंतर विधानसभेने सिद्ध केले.

संविधान धोक्यात आहे,
लोकसभेत बरोबर डाव साधला गेला.
कटेंगे तो बटेंगे चा नारा,
विधानसभा निवडणुकीत वदला गेला.

जिंकणारांची आणि हरणारांची,
या सगळ्यावरती एकवाक्याता आहे !
प्रचारापेक्षा अपप्रचाराचाच पॅटर्न,
आगामी काळात येण्याची शक्यता आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8750
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
25 नोव्हेंबर2024
 

Sunday, November 24, 2024

दैनिक वात्रटिका l 24नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 175 वा


दैनिक वात्रटिका l 24नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 175 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

Saturday, November 23, 2024

दैनिक वात्रटिका l 23नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 174 वा


दैनिक वात्रटिका l 23नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 174 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

आमदार निवास ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

आमदार निवास

फोडाफोडीच्या राजकारणामुळे,
सगळ्यांना चांगले दिवस येतात.
सगळे फाईव्ह स्टार हॉटेल्स,
चक्क आमदार निवास होतात.

कुणी कुणी थांबवले जातात,
कुणी कुणी मात्र थांबले जातात
कुणासाठी आमदार निवास,
कुणी कुणी मात्र तिथे डांबले जाते.

सगळेच होतात मूक बधिर,
फक्त पैसाच बोलला जातो !
हल्ली नव्या सरकारचा पाळणा,
हॉटेला हॉटेलातून हलला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8749
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
23नोव्हेंबर2024
 

Friday, November 22, 2024

दैनिक वात्रटिका l 19नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 172 वा l पाने -39


दैनिक वात्रटिका l 19नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 172 वा l पाने -39
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

बंडखोरांच्या टोळ्या ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

बंडखोरांच्या टोळ्या 

कुणी परत यायला लागले, 
कुणी परत जायला लागले. 
ज्यांना पक्षात घेणार नव्हते, 
त्यांनाच परत घ्यायला लागले. 

आपल्यासाठी धक्कादायक, 
त्यांना आवक-जावक सोपी आहे.
जाणारे येणारे खुशीत, 
निष्ठावंतांची मात्र गळचेपी आहे.

एकूणच काय तर सगळीकडे, 
निवडून येणाऱ्यांच्या मोळ्या आहेत !
आघाड्या आणि युत्या म्हणजे,
बंडखोरांच्या टोळ्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8746
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
20नोव्हेंबर2024

 

लोकशाही दर्शन..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

------------------------

लोकशाही दर्शन

जसे अपक्षाकडून लुटले जाते,
तसे पक्षांकडूनही लुटले जाते.
लोकशाहीला नाचविण्याचे,
असूरी समाधान भेटले जाते.

नैतिकता नावाच्या गुणाला
पुन्हा पुन्हा हतबुद्ध केले जाते.
लोकशाही नावाच्या रांडेला,
पुन्हा पतिव्रता सिद्ध केले जाते.

लोकशाही आणि दंडेलशाहीत,
जमीन - अस्मानाचे मार्जिन आहे!
जे नागवितात लोकशाहीला,
त्यांनाच लोकशाही धार्जिण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8748
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
22नोव्हेंबर2024

राजकीय व्यंग ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------------

राजकीय व्यंग 

असंगाशीच संग आहे,
जो तो सत्तेसाठी दंग आहे. 
आजचे राजकारण म्हणजे, 
बीभत्स राजकीय व्यंग आहे. 

परस्परांची टवाळी आहे, 
लोकशाहीची टिंगल आहे. 
अत्यंत हास्यास्पद अशी, 
राजकारणाची दंगल आहे.

विरोधाभासाचे धक्के तर,
सगळीकडूनच बसत आहेत !
याचा उलगडा न केलेला बरा,
कोण कुणावर हसत आहेत?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8747
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
21नोव्हेंबर2024

 

शेवटची रात्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

शेवटची रात्र

मिळेल ती संधी साधायला,
जो तो अगदी टपून असतो.
अपप्रचार असतो उघड,
प्रचार लपून छपून असतो.

अपप्रचाराला उजेडाची तर,
प्रचाराला अंधाराची साथ असते.
नोट के बदले व्होट,
प्रत्येक गल्लीबोळ गात असते.

जशी रात्र वैऱ्याची असते,
तशी ती सोयऱ्या धायऱ्याची असते !
लोकशाहीचे गाणे ऐकणार कोण?
रात्र मुक्या आणि बहिऱ्याची असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8745
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
19 नोव्हेंबर2024
 

Tuesday, November 19, 2024

दैनिक वात्रटिका l 19नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 172 वा

दैनिक वात्रटिका l 19नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 172 वा l पाने -39
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

शेवटची रात्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

शेवटची रात्र

मिळेल ती संधी साधायला,
जो तो अगदी टपून असतो.
अपप्रचार असतो उघड,
प्रचार लपून छपून असतो.

अपप्रचाराला उजेडाची तर,
प्रचाराला अंधाराची साथ असते.
नोट के बदले व्होट,
प्रत्येक गल्लीबोळ गात असते.

जशी रात्र वैऱ्याची असते,
तशी ती सोयऱ्या धायऱ्याची असते !
लोकशाहीचे गाणे ऐकणार कोण?
रात्र मुक्या आणि बहिऱ्याची असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8745
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
19 नोव्हेंबर2024
 


Monday, November 18, 2024

दैनिक वात्रटिका l 18नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 171 वा


दैनिक वात्रटिका l 18नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 171 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

कुसंगती आणि विसंगती....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

कुसंगती आणि विसंगती

जसे लोकांना कळत नाही,
तसे त्यांचे त्यांनाही कळत नाही.
कोण कोणाच्या विरोधात?
याचे उत्तर त्यांनाही मिळत नाही.

कालची विसंगती निस्तरेपर्यंत,
नवी विसंगती समोर येते आहे.
काल केलेली सावरासावर,
रोज नव्याने गोते खाते आहे.

एक है तो... सेफ है...
तरीही सर्वांच्याच तोडी नारा आहे !
बटेंगे तो कटेंगे.... चा अर्थ,
कुणी न सांगितलेलाच बरा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8744
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
18 नोव्हेंबर2024
 

Sunday, November 17, 2024

दैनिक वात्रटिका l 17नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 170 वा


दैनिक वात्रटिका l 17नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 170 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

प्रचाराच्या जाहिराती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

प्रचाराच्या जाहिराती

जशा कुणासाठी तारक आहेत,
तशा कुणासाठी मारक आहेत.
कामगिरी आणि धोरणांपेक्षा,
जाहिराती परिणामकारक आहेत.

करावे टिचभर;दाखवावे हातभर,
अशी जाहिरातींची तऱ्हा आहे.
मीडियापासून सोशल मीडियापर्यंत,
फक्त जाहिरातींचाच मारा आहे.

शक्याबरोबर अशक्यसुद्धा,
ते जाहिरातींमधून फेकू लागले !
जाहिरातींची नशा चढवून,
सगळेच स्वप्नसुद्धा विकू लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8743
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
15 नोव्हेंबर2024
 

Saturday, November 16, 2024

दैनिक वात्रटिका l 16नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 169 वा

दैनिक वात्रटिका l 16नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 169 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

हम सब एक है..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

हम सब एक है..

कुणीही कसाही इशारा केला तरी,
समजदाराला तेवढेच काफी आहे.
एक है तो....सेफ है,
ही कटेंगे - बटेंगेची सॉफ्ट कॉपी आहे.

ही काही योगा - योगीची गोष्ट नाही,
ज्याचा त्याचा वेगवेगळा अर्थ आहे.
मग कुणालाही नक्की समजू शकते,
आमचाच अर्थ किती सार्थ आहे?

नकारात्मक विचार नको,
आपण सगळे सकारात्मक होऊ या !
हम सब एक है....
हा पारंपरिक नारा पुन्हा देऊ या !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8742
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
16 नोव्हेंबर2024
 

Friday, November 15, 2024

दैनिक वात्रटिका l 15नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 168 वा


दैनिक वात्रटिका l 15नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 168 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

जाहीरनाम्यांची औपचारिकता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

जाहीरनाम्यांची औपचारिकता

सर्वांचे जाहीरनामे म्हणजे,
चक्क परस्परांच्या कॉप्या असतात.
सगळ्यांकडून जनतेला,
अगदी जगजाहीर टोप्या असतात.

जाहीरनाम्यातील आश्वासनांच्या,
थोड्याशा अलट्या पलट्या असतात.
आपला जाहीरनामा चोरल्याच्या,
त्यांच्या बोंबासुद्धा उलट्या असतात.

मित्रपक्ष बदलले गेले तरी,
जाहीरनाम्यात फरक पडत नाही !
जाहीरनामा म्हणजे औपचारिकता,
त्याच्याशिवाय काहीच नडत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8741
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
15 नोव्हेंबर2024
 

Thursday, November 14, 2024

दैनिक वात्रटिका l 14नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 167 वा


दैनिक वात्रटिका l 14नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 167 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

चिन्हांकित निवडणूक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

चिन्हांकित निवडणूक

उमेदवार आणि पक्षापेक्षाही,
चिन्ह महत्त्वाचे ठरते आहे.
सामान्य जनता सुद्धा,
चिन्हावरच मतदान करते आहे.

कुणासाठी चिन्ह सुचिन्ह आहे,
कुणासाठी चिन्ह दुश्चिन्ह आहे.
अपक्ष उमेदवारांचे तर,
सगळ्यांपेक्षाच भिन्न आहे.

ज्यांचे ज्यांचे निवडणूक चिन्ह,
दिसायला सेम टू सेम आहे !
त्यांच्यातल्या कुणाचा तरी,
निवडणुकीत नक्की गेम आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8740
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
14 नोव्हेंबर2024
 

Wednesday, November 13, 2024

दैनिक वात्रटिका l 13नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 166 वा


दैनिक वात्रटिका l 13नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 166 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

अशी ही पाठिंब्याची तऱ्हा ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अशी ही पाठिंब्याची तऱ्हा

कुुणी पाठिंबा देते आहे,
कुणी पाठिंबा काढून घेते आहे.
निवडणुकीच्या धामधुमीत,
पाठिंब्याची ऐशी तैशी होते आहे.

कुणाचा पाठिंबा उघड आहे,
कुणाचा पाठिंबा आतून आहे.
कुणी पाठिंबा मागावा म्हणून,
अगदीच नटून थटून आहे.

कुणाचा पाठिंबा दिखाऊ आहे,
कुणाचा पाठिंबा विकाऊ आहे !
दिला काय?नाही दिला काय?
कुणाचा पाठिंबा टाकाऊ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8739
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
13 नोव्हेंबर2024
 

Tuesday, November 12, 2024

दैनिक वात्रटिका l 12नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 165 वा


दैनिक वात्रटिका l 12नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 165 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

बॅग म्हणाली खोक्याला

आजची वात्रटिका
--------------------------

बॅग म्हणाली खोक्याला

त्यांचे झाले राजकारण,
ताप आपल्या डोक्याला.
धुसफुसत आणि फुसफुसत,
बॅग म्हणाली खोक्याला.

पेट्या झाल्या कालबाह्य,
चौकशी मात्र आपली आहे.
नाक्या-नाक्यावरती,
पोलिसांचीनजर टपली आहे.

घेणारे देणारे बाजूला,
धोक्यात मात्र वाहक आहे !
तुझ्याबरोबर माझीही,
बदनामी तर नाहक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8738
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
12 नोव्हेंबर2024
 

Monday, November 11, 2024

दैनिक वात्रटिका l 11नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 164 वा l पाने -42अंक डाऊनलोड


दैनिक वात्रटिका l 11नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 164 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

लाचार नामा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

लाचार नामा

कुणीतरी जिंकते आहे,
कुणीतरी पडते आहे.
लाचारीची सवय मात्र,
मतदारांना पडते आहे.

सगळेच लाचार नसले तरी,
त्यांची संख्या मोठी आहे.
लोकशाही जिंदाबाद नारा
लाचारांच्याही ओठी आहे.

सत्तापालट झाला तरी,
लाचार कायम असतात!
स्वाभिमानी लोकांसाठी,
लोकशाहीचे नियम असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8737
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
11 नोव्हेंबर2024
 

Sunday, November 10, 2024

दैनिक वात्रटिका l 10नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 163 वा


दैनिक वात्रटिका l 10नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 163 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

घुसखोरीचा भावार्थ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

घुसखोरीचा भावार्थ

काल तिकडे दिसणारे,
आज इकडे दिसू लागले.
जिथे ज्याला घुसता येईल,
तिथे तिथे ते घुसू लागले.

घुसखोरांच्या घुसखोरीला,
काळाचे काही बंधन नाही.
घुसखोरी ती घुसखोरी,
निष्ठा काही आंदण नाही.

प्रत्येकाच्या घुसखोरीला,
जसे वेगवेगळे नाव आहे !
तसे त्यांच्या येण्या जाण्याचा,
वेगवेगळा भाव आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8736
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
10 नोव्हेंबर2024
 

Saturday, November 9, 2024

दैनिक वात्रटिका l 9नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 162 वा


दैनिक वात्रटिका l 9नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 162 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

अप्रिय आठवण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अप्रिय आठवण

सुटलो बुवा एकदाचे...
असाच ज्याचा त्याचा इको आहे.
झाले गेले गंगेला मिळाले,
ईडीची आठवण कुणालाच नको आहे.

कुणाला लागली शांत झोप,
कुणामागे चौकशीचा खो खो आहे.
अंगावरती फुटतो काटा,
ईडीची आठवण कुणालाच नको आहे.

कुणी अंदर;कुणी बाहर,
कुणाची तऱ्हा फेको एके फेको आहे!
धाड.. धाड..धाड करते छाती,
ईडीची आठवण कुणालाच नको आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8735
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
9 नोव्हेंबर2024
 

Friday, November 8, 2024

दैनिक वात्रटिका l 8नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 161 वा


दैनिक वात्रटिका l 8नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 161 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

प्रचार सभा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

प्रचार सभा

जसे कुणा कुणाला पटत नाही,
तसे कुणा कुणाला पटते आहे.
आम्हाला मात्र जुनीच भाषणं,
पुन्हा ऐकल्यासारखे वाटते आहे.

त्याच मुद्द्यांचे;त्याच गुद्धांचे,
सगळीकडे सारखेच पारायण आहे.
काही काही मुद्द्यांचे तर,
सगळीकडे सारखेच चोरायण आहे.

टिंगल आहे;टवाळी आहे,
आपल्या विरोधकांची खिल्ली आहे!
आपलेच दात;आपलेच ओठ,
कुणी कुणी तर माती खाल्ली आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8734
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
8 नोव्हेंबर2024
 

Thursday, November 7, 2024

दैनिक वात्रटिका l 7नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 160 वा


दैनिक वात्रटिका l 7नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 160 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

प्रचाराची वस्तुस्थिती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

प्रचाराची वस्तुस्थिती

सगळेच एकमेकांची इज्जत,
प्रचार सभेत काढायला लागले.
रंगाचे बेरंग होत असले तरी,
प्रचाराला रंग चढायला लागले.

काय त्यांचे आरोप प्रत्यारोप?
कसली कसली त्यांची भाषा आहे?
लोकांची तर पक्की खात्री पटली,
प्रचार म्हणजे उघडा तमाशा आहे.

कुणी मारतोय ढगात गोळ्या,
कुणाचे आरोप पुराव्यासहित आहेत !
हे सांगायला चोरी कसली?
ज्याच्या वाटा त्यालाच माहित आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8733
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
7 नोव्हेंबर2024
 

Wednesday, November 6, 2024

दैनिक वात्रटिका l 6नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 159 वा

दैनिक वात्रटिका l 6नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 159 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

लोकशाहीच्या नावानं..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

लोकशाहीच्या नावानं..

स्वतः निवडून येण्यापेक्षा,
इतरांना पाडणे तसे इझी आहे.
पायात पाय घालण्यातच,
आज प्रत्येक जण बिझी आहे.

उपयोगितामूल्य वाढण्याऐवजी
आज उपद्रवमूल्य वाढते आहे.
सुडाच्या राजकारणापोटीच,
आज सगळीकडे हेच घडते आहे.

जिंकले काय? हरले काय?
निवडणुकीत सुडाचा भाव नको !
कुणाच्या वैयक्तिक दुश्मनीला,
बिचाऱ्या लोकशाहीचे नाव नको !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8732
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
6 नोव्हेंबर2024
 

दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 298वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 298वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1QFQFkgKdfL7eY4viFxy...