Showing posts with label पाचशे कोटींची कुजबुज आजची वात्रटिका. Show all posts
Showing posts with label पाचशे कोटींची कुजबुज आजची वात्रटिका. Show all posts

Thursday, October 22, 2026

पाचशे कोटींची कुजबुज

आजची वात्रटिका
---------------------
पाचशे कोटींची कुजबुज
आपल्या अकलेचा कीस पडून,
डोक्याला डोके लागू शकतात.
सांगा पाचशे कोटी भरायला,
नेमके किती खोके लागू शकतात?
तुमची आमची फक्त आकडेमोड,
आपल्याला ना देणे आणि घेणे आहे.
झाकली मूठ सव्वा लाखाची,
आपण या निष्कर्षापर्यंत येणे आहे.
कुणाची फिल्डिंग टाईट झाली,
कुणाची फिल्डिंग मात्र लूज आहे !
वाऱ्यावरच्या वरातीला साक्ष,
पाचशे कोटींची कुजबुज आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9435
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
22ऑक्टोबर 2026

 

पाचशे कोटींची कुजबुज

आजची वात्रटिका --------------------- पाचशे कोटींची कुजबुज आपल्या अकलेचा कीस पडून, डोक्याला डोके लागू शकतात. सांगा पाचशे कोटी भरायला, नेमके क...