Friday, October 20, 2023

दैनिक वात्रटिका20ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -137वा अंक


 दैनिक वात्रटिका
20ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -137वा 
अंक डाऊनलोड लिंक -

नवा भेद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

नवा भेद

शाकाहार विरुद्ध मांसाहार,
नव्या भेदाची भरती आहे.
ज्याच्या त्याच्याकडून तर,
स्वतःचीच आरती आहे.

ज्याला जे खायचेय ते खा,
खाण्यावरून असे पेटू नका !
द्वेषाचे कधीच पोट भरत नाही,
कुणीही द्वेषाने पेटून उठू नका !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8387
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
20ऑक्टोबर2023
 

Thursday, October 19, 2023

दैनिक वात्रटिका19ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -136वा


दैनिक वात्रटिका
19ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -136वा 
अंक डाऊनलोड लिंक -

नवरंग आहार.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
नवरंग आहार
नवरात्रीच्या नवरंगांना,
आता नवीनच बहार आहे.
ज्या दिवसाचा जो रंग,
त्याच रंगाचा आहार आहे.
नवरात्रीच्या नवा रंगांची,
ही तर नवीनच धूम आहे.
जसे ल्यावे;तसेच खावे,
ही तर नवीनच टूम आहे.
ही रंगीत संगीत मेजवानी?
की हा डाएट प्लॅन आहे ?
आपल्यासाठी हे हास्यास्पद,
पण भक्तांसाठी छान आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3रे
19ऑक्टोबर2023

 

Wednesday, October 18, 2023

दैनिक वात्रटिका18ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -135वा

दैनिक वात्रटिका
18ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -135वा 
अंक डाऊनलोड लिंक -

 

भूकंपाच्या पूर्वसूचना....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

भूकंपाच्या पूर्वसूचना

कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडे,
जशा याचनावरती याचना आहेत.
तशा महाराष्ट्रातही भूकंपाच्या,
पूर्वसूचनावरती पूर्व सूचना आहेत.

राजकीय भूकंपाच्या पूर्वसूचनेने,
शंका आणि कुशंकांनाही ऊत आहेत.
भूकंपाच्या पूर्वसूचना देणारे,
सगळे पेरलेले राजकीय दूत आहेत.

ज्याच्या त्याच्या डोक्यामध्ये,
चूकचुकणारी शंकेची पाल असेल !
इतरांना भूकंपाचे धक्के असतील,
त्यांच्यासाठी राजकीय चाल असेल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8385
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
18ऑक्टोबर2023
 

Tuesday, October 17, 2023

दैनिक वात्रटिका17ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -134वा


 दैनिक वात्रटिका
17ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -134वा 
अंक डाऊनलोड लिंक -

ऑलिंपिकमध्ये क्रिकेट..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

ऑलिंपिकमध्ये क्रिकेट

ऑलिंपिकच्या वर्तुळात,
आता क्रिकेटचीही एन्ट्री आहे.
ऑलिंपिकच्या कुंभमेळ्यात,
आता क्रिकेटचीही कॉमेंट्री आहे.

क्रिकेटच्या मार्केटला,
आता नवा बाजार खुला आहे.
क्रिकेटचे विश्व विस्तारले,
ऑलिंपिकने विश्वास दिला आहे.

कोट्यावधीत खेळणाऱ्यांना,
एका मेडलसाठी खेळावे लागेल !
टेस्टला आणि वनडे ला मात्र,
पार धुळीस मिळावे लागेल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8384
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
17ऑक्टोबर2023
 

Monday, October 16, 2023

दैनिक वात्रटिका16ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -133वा


दैनिक वात्रटिका
16ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -133वा 
अंक डाऊनलोड लिंक -

मुखवट्या मागचा दुखवटा..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मुखवट्या मागचा दुखवटा

जमेल त्याचे हात धरू लागले,
जमेल त्याचे पाय धरू लागले.
आघाड्यांच्या नावाखाली,
सर्वच पक्ष बघा काय करू लागले?

सगळ्या भाराभर चिंध्या वाटतात,
त्यांच्यामध्ये एक ना धड आहे.
भूमिका बदलणे सोपे आहे,
पण भूमिका निभावणे अवघड आहे.

कुणी बदलत आहे चेहरा,
कुणाच्या चेहऱ्यावर मुखवटा आहे !
वर वर तडजोडीचा आनंद,
आत मध्ये मात्र दुखवटा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8383
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
16ऑक्टोबर2023
 

Sunday, October 15, 2023

दैनिक वात्रटिका 15ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..


दैनिक वात्रटिका
15ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -132वा
अंक डाऊनलोड लिंक -https://drive.google.com/file/d/1NwKXcCsYrYqrnF3_ig6RPRVW9H4HyE7u/view?usp=drivesdk
 

रंगवेडी तऱ्हा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

रंगवेडी तऱ्हा

आजचा अमुक रंग आहे,
उद्याचा तमुक रंग आहे.
सगळ्याच रंगबावऱ्यांना,
रोज नव्या रंगाची झिंग आहे.

एक एक रंग वेडी,
एवढी काही रंग वेडी आहे.
सकाळ,दुपार,संध्याकाळ,
वेगळ्या छटांची साडी आहे.

एकच रंग पण छटा अनेक,
अशी त्यांची रंगवेडी तऱ्हा आहे !
कुणाच्या अकलेचा पंचनामा,
आपण न केलेलाच बरा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8382
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
15ऑक्टोबर2023
 

Saturday, October 14, 2023

दैनिक वात्रटिका14ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -131वा


दैनिक वात्रटिका
14ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -131वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

मानसिक सौंदर्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

मानसिक सौंदर्य

जसे आपण शरीराला जपतो,
तसे मनालाही जपले पाहिजे.
जेवढे शरीरा सुंदर ठेवतो,
तेवढेच सुंदर मन आपले पाहिजे.

आपल्या व्यक्तिमत्त्वाचे आरसे,
म्हणजे शरीर आणि मन आहेत.
आपण वेगवेगळे मानले तरी,
सांगा तसेही ते कुठे दोन आहेत ?

शरीर सुंदर म्हणजे मन सुंदर,
याची सांगा कुठे शक्यता असते?
मात्र सुंदर मन आणि सुंदर जग,
याच्यात मात्र एक वाक्यता असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8381
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
14ऑक्टोबर2023
 

Friday, October 13, 2023

दैनिक वात्रटिका13ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -130वा

दैनिक वात्रटिका
13ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -130वा 
अंक डाऊनलोड लिंक -

 


शल्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

शल्य

तुमची जिंकण्याची शक्यता,
जेंव्हा पैकीच्या पैकी असते.
तेंव्हा जिंकून येण्याची क्षमताच,
उमेदवारीची लायकी असते.

तुम्ही निवडून येऊ शकता,
हेच तुमचे पुण्य असते,
निष्ठा, कार्य आणि कर्तृत्व,
बाकी सगळेच शून्य असते.

तुमची जिंकण्याची क्षमता,
हेच तुमचे उपद्रव मूल्य असते !
आकडेबाजीच्या खेळाचे,
हेच सर्वात मोठे शल्य असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8380
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
13ऑक्टोबर2023
 

Thursday, October 12, 2023

दैनिक वात्रटिका12ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -129वा

दैनिक वात्रटिका
12ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -129वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 


सत्याची गळचेपी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सत्याची गळचेपी

सत्यापेक्षा असत्याचाच,
आज सगळीकडे डंका आहे.
असत्याचे होते कौतुक,
पण सत्यावरतीच शंका आहे.

असत्याकडे कानाडोळा,
सत्याकडे बोट उठले जाते.
सत्यावर शंका घेतल्याने,
असत्य मोकाट सुटले जाते.

सत्य हे सत्य असले तरी,
सत्य कुणाला पेलवत नाही!
कितीही इच्छा असली तरी,
सर्वांना सत्य बोलवत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8379
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
12ऑक्टोबर2023
 

Wednesday, October 11, 2023

दैनिक वात्रटिका11ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -128वा



दैनिक वात्रटिका
11ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -128वा 
अंक डाऊनलोड लिंक -

कॉपीचे हायटेक दर्शन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

कॉपीचे हायटेक दर्शन

वाढत्या बेरोजगारीचा ,
फक्त इशाराच काफी आहे.
कोतवालाच्या परीक्षेतसुद्धा,
आता हायटेक कॉपी आहे .

वाढत्या बेरोजगारीचा इशारा,
समजून घेतलेलाच बरा आहे.
उलटा चोर कोतवाल को डाटे,
अशीच काहीशी तऱ्हा आहे.

बेरोजगारी वाढविते स्पर्धा,
स्पर्धा कॉप्या वाढविते आहे !
लो प्रोफाइल परीक्षेतही,
कॉपी हायटेक दर्शन घडवितेआहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8378
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
11ऑक्टोबर2023
 

Tuesday, October 10, 2023

दैनिक वात्रटिका10ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..अंक -127वा


दैनिक वात्रटिका
10ऑक्टोबर2023....वर्ष- तिसरे..
अंक -127वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

सामाजिक अवस्था...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सामाजिक अवस्था

कुणी मेले काय?कुणी जगले काय?
लोकांनाही कशाचे काही वाटत नाही.
कितीही टाहो ऐकले तरी,
कुणाला हुंदकाही सुद्धा फुटत नाही.

जणू काय आजकाल लोकांची,
सगळी संवेदनशीलता मेली आहे !
रोजचेच मढे त्याला कोण रडे,
यामुळेच ही अवस्था झाली आहे !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8377
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
10ऑक्टोबर2023
 

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...