Sunday, July 19, 2009

नवनिर्माणाचा राडा

***** आजची वात्रटिका *****
**********************

नवनिर्माणाचा राडा

रस्त्यांवरील राड्याचे लोण
पक्षामध्ये पसरले गेले.
नवनिर्माणाचा संकल्पही
त्याच राड्यात विसरले गेले.

जे आशा लावून बसले आहेत
त्यांचाही भ्रमनिरास होईल !
कुणाच्या ध्यानी-मनीही नव्हते
नवनिर्माणाची अशी हरास होईल !!

(शब्दार्थ:-हरास=जाहिर लिलाव)

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...