Thursday, July 16, 2009

ऑर्कु्टचे वास्तव

***** आजची वात्रटिका *****
**********************

ऑर्कु्टचे वास्तव

चेहर्‍यावर अनेक चेहरे
लावतात लोक येथे.
गर्ल्स फ्रेण्ड्च्याच मागे
धावतात लोक येथे.

कॉपी-पेस्ट्चाच मंत्र
इथे जपवला जातो.
कुठे न खपलेला माल
इथे खपवला जातो.

मैत्रीची नातीही इथे
तकलादू-बेगडी असतात.
आपल्या घराचे दरवाजे
कुठे सर्वांसाठी उघडी असतात ?

एका वर्षात अनेक वॆळा
इथे वाढदिवस साजरे होतात.
शुभेच्छा लाटणारांच्यासमोर
इथे शुभेच्छुकच लाजरे होतात.

नकली नावे,नकली चेहरे
जो तो इथे मिरवतो आहे !
वास्तवाच्या आभासामध्ये
खरा चेहराही हरवतो आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उदात्तीकरणाचे प्रयोग अनिष्ट आणि घातक परंपरांचे, एक मात्र खूप छान असते. अनिष्ट आणि घातक परंपरांना, ...