Sunday, July 19, 2009

महागाईचा ’तुर’ टपणा

***** आजची वात्रटिका *****
**********************

महागाईचा ’तुर’ टपणा

सर्वसामान्यांच्या हातांवर
वाढत्या महागाईची तुरी आहे.
घट करती का पातळ करती?
हा संवाद तर घरोघरी आहे.

डाळीने ठरविलेले दिसतेय
ताकास तुर लागु द्यायची नाही !
सेंच्युरी मारल्याशिवाय काही
आता मुळीच माघार घ्यायची नाही!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

अनलॉक वन