Tuesday, July 28, 2009

पक्षांनो कार्यकर्ते सांभाळा...

***** आजची वात्रटिका *****
**********************

पक्षांनो कार्यकर्ते सांभाळा...

कार्यकर्ते किती ’हाडाचे’ आहेत
ते धाब्या-धाब्याला विचारा.
ते कुणाला मिसकॉल मारतात ?
ते गल्लोगल्लीच्या बाब्याला विचारा.

कार्यकर्ता जगायचा असेल तर
त्याने खाल्ले-पिल्ले पाहिजे !
धाबे दणाणले तरी कळत नाही
आम्हीच काय बोलले पाहिजे ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोद(बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...