Tuesday, July 21, 2009

फुटाफुटी ते कुटाकुटी

***** आजची वात्रटिका *****
**********************

फुटाफुटी ते कुटाकुटी

पक्षा-पक्षातल्या सुभेदारांना
जास्तच पंख फुटू लागले.
गटा-तटाच्या वादावरून
परस्परांनाच कुटू लागले.

जिंदाबाद-मुर्दाबादसोबत
हाणामारीची भाषा ऒठी आहे !
फुटा-फुटी तर जुनीच होती,
आता नव्याने ही कुटाकुटी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा, (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...