***** आजची वात्रटिका *****
**********************
वाढदिवसांची वाढ
वाढदिवस साजरे केल्याशिवाय
जणु नेते, नेते वाटत नाहीत.
बारशापासून शताब्दीपर्यंत
कुठलेच महोत्सव सुटत नाहीत.
नेत्यांच्या वाढदिवसाला
कार्यकर्त्यांचेच थाट असतात.
लेकराबाळांचे नसले तरी
नेत्यांचे वाढदिवस पाठ असतात.
अमके दान, तमके दान,
कार्यक्रमांची दाणादान असते.
पक्षीय मतभेद विसरल्याची
ऍक्टींग पण फार छान असते.
नेत्यांचे वाढदिवस,
नेत्यांना लखलाभ होवोत !
" तुम जिओ हजारों साल "
पण जनतेच्या नशिबी,
सुखाचे चार दिवस येवोत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
No comments:
Post a Comment