Thursday, July 23, 2009
देशग्रहण
देशग्रहण
खग्रास ग्रहण लागावे
अशीच देशाची रया आहे.
पांढर्या खादीचीच
देशावरती छाया आहे.
गिळागिळी म्हणजे ग्रहण नाही
ग्रहणाच अर्थ कळतो आहे.
दररोज नवा राहू-केतु
जमेल तेवढे गिळतो आहे.
उघड्या डोळयांनी सारे,
हे ग्रहण बघतो आहोत !
त्यांना नवेनवे वेध लागतात
आपण कुठे जागतो आहोत ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Subscribe to:
Post Comments (Atom)
दैनिक वात्रटिका17एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -315वा
दैनिक वात्रटिका 17एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -315वा पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1GhFiPdgtsKPEtdc40LVd_...
-
दैनिक वात्रटिका 26मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -293वा पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/14Hy6p12emhA2y5REF-CCJL...
No comments:
Post a Comment