Tuesday, July 21, 2009

गटार सोहळा

***** आजचीच वात्रटिका *****
***********************

गटार सोहळा

आधिच तर उल्हास,
त्यात घाईला आषाढ मास येतो.
गटारीच्या टोकावरून
येणार्‍या श्रावणाचा वास येतो.

जे बनतात बळीचे बकरे,
त्या चोंबड्यांची पर्वा करू कशाला?
करणारे क्वाक क्वाक करतील
त्या कोंबड्यांची पर्वा करू कशाला ?

ते वाजविती तुणतुणे कितीही
मज वाटते ती गिटार आहे.
हा आषाढ सोहळा पंगतो
साक्षीला तुंबलेली गटार आहे.

थु ss त्या विदेशी पिणारांची
संस्कॄतीशी अशी गट्टी व्हावी
ग्लासास ग्लास भिडवतो कोण?
थेट बाटलीनेच हातभट्टी प्यावी.

श्रावणाच्या भितीपोटीच बघा
ही अमावश्य़ा अशी रंगा येते !
खाऊन,पिऊन पावन झालो
आमच्यासाठी गटारच गंगा होते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...