***** आजची वात्रटिका *****
**********************
हरी विठ्ठल.....
थोरल्या विठोबाप्रमाणे बडवे
धाकट्या विठोबास घेरू लागले.
नवनिर्माणाला लागलेले सैनिक
पुन्हा माघारी फिरू लागले.
विठू त्यांचा लेकुरवाळा,
पुन्हा बडव्यांवरच राग आहे !
थोरल्या पंढरीची सय होता
धाकट्या पंढरीचा त्याग आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
No comments:
Post a Comment