Monday, July 20, 2009

संसाराचा खेळ

***** आजची वात्रटिका *****
**********************

संसाराचा खेळ

त्याला आवडायचा फुटबॉल,
तीला आवडायचा क्रिकेट.
कधी व्हायचा गोल तर,
कधी पडायची विकेट.

मग त्यांच्या लक्षात आले,
संसार म्हणजे खेळ नसतो !
आवडी-निवडी वेगळ्या तरी,
तो दोन जीवांचा मेळ असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा,(बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...