Sunday, July 26, 2009

पांढरे साप

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
कारगिल ’विजय दिना’ निमित्त शहिदांना सलाम !!

***** आजची वात्रटिका *****
**********************

पांढरे साप

किती दिवस करणार
पुन्हा पुन्हा पाप हे ?
दुध पाजून पोसणार
विषारी पांढरे साप हे ?

काल वेगळे,आज वेगळे
पांढर्‍या सापांचे बिळ आहे !
किती पंचम्या आल्या गेल्या?
चालूच त्यांची गिळागिळ आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...