Wednesday, July 29, 2009

’राज’कीय व्याख्या

***** आजची वात्रटिका *****
**********************

’राज’कीय व्याख्या

उठ्सुठ पक्ष बदलणारे
त्यांच्या मते फेरीवाले आहेत.
या राजकीय व्याख्येमुळे
त्यांचेच वांधे झाले आहेत.

दुसर्‍याचे कुसळ दिसते,
आपल्या मुसळाकडे कुठे लक्ष आहे?
अगदी मनापासून सांगतो,
त्यांचाही फेरीवाल्यांचाच पक्ष आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...