Tuesday, July 28, 2009

सच का सामना

***** आजची वात्रटिका *****
**********************

सच का सामना

लोकांच्या खाजगी जीवनात
नको तेवढे डोकू लागले.
रिऍलिटी शो च्या नावाखाली
नको नको ते विकू लागले.

एखादा क्षणिक विचार
कायमचे सत्य असू शकत नाही !
टि.आर.पी. सारखा प्रेक्षक मात्र
या ’माया’जालात फसू शकत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

अज्ञानातला आनंद ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- अज्ञानातला आनंद एकदा भावना भडकल्या की, वास्तवाचेही भान राहत नाही. आपण निव्वळ अज्ञानी आहोत, याचेह...