Saturday, July 25, 2009

सर्वपक्षसमभाव

***** आजची वात्रटिका *****
**********************

सर्वपक्षसमभाव

कधी इकडे,कधी तिकडे
तिकीटासाठी गोंडा घोळला जातो.
सर्वपक्षसमभाव असा,
राजकारण्यांकडून पाळला जातो.

पक्ष,धोरण,निष्टा,त्याग
हे तर केवळ आव असतात !
तिकीटवाटपात मात्र
सर्वपक्षात सम ’भाव’ असतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

daily vatratika...3april2025