Thursday, July 30, 2009

वाईटातुन चांगले

***** आजची वात्रटिका *****
*********************

वाईटातुन चांगले

लोकसभेचे शल्य
राज्यसभेत टोचले गेले.
उमेदवारीचे खरे सत्य
लोकांपर्यंत पोचले गेले.

दंवडीच्या पहिलवानालाही
फुटाणे आणि रेवड्या आहेत.
नाकारले की ठोकरले ?
वावड्यावर वावड्या आहेत.

दोन्ही घरच्या पाहूण्याचे
शेवटी मुठीमध्ये नाक आहे !
डोक्यावरून पाणी गेल्यावर
दलित ऎक्याची हाक आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

daily vatratika...3april2025